Ad will apear here
Next
जागतिक दिव्यांग दिनी रत्नागिरीत समावेशित एकता दौड
सर्वसमावेशित एकता दौडीपूर्वी वॉर्मअप करताना विद्यार्थी.

रत्नागिरी :
जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने तीन डिसेंबर २०१९ रोजी रत्नागिरीत समावेशित एकता दौड आयोजित करण्यात आली होती. ती  अत्यंत उत्साहात पार पडली. मूकबधिर, दिव्यांग आणि मतिमंद शाळांमधील विद्यार्थ्यांबरोबरच सर्वसामान्य विद्यार्थीही एकता दौडीत सहभागी झाले होते.

रत्नागिरीतील आविष्कार संस्थेची श्यामराव भिडे कार्यशाळा आणि सौ. सविता कामत विद्यामंदिर, तसेच कै. के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयाच्या एकत्रित सहभागाने ही समावेशित एकता दौड आयोजित करण्यात आली होती. दिव्यांग विद्यार्थ्यांना स्वतंत्र शाळांच्या ऐवजी समाजाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करून घेण्याकरिता इतर सर्वसामान्य विद्यार्थ्यांसोबत शिक्षण घेता यावे, यासाठी त्याच शाळांमध्ये त्यांना समाविष्ट करण्याचे शासनाचे नवे शैक्षणिक धोरण आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांमधील न्यूनगंड कमी करण्याचा त्यामागचा उद्देश आहे. दिव्यांग व्यक्तींमधील सुप्त गुणांचा शोध घेऊन त्यांना योग्य दिशा दिली, तर दिव्यांगदेखील समाजाच्या मुख्य प्रवाहात सहजरीत्या मिसळून जाऊ शकतो, असा दृष्टिकोन समाजाने बाळगावा, या उद्देशाने रत्नागिरीतील दिव्यांगांच्या तीन शाळांनी एकत्र येऊन दिव्यांग दिनानिमित्त समावेशित एकता दौड आयोजित केली होती.

हिरवा झेंडा दाखवताना पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे व समाजकल्याण अधिकारी डॉ. यतिन पुजारी. सोबत सीए बिपीन शहा, संपदा जोशी, सचिन वायंगणकर व गजानन रजपूत.

एकता दौडीत पन्नास दिव्यांग स्पर्धक आणि सर्वसामान्यांच्या नऊ शाळांमधील पन्नास विद्यार्थी सहभागी झाले. दौड तीन गटांमध्ये झाली. प्रत्येक गटात जेवढे दिव्यांग तेवढेच सर्वसामान्य स्पर्धक असतील, अशी रचना करण्यात आली. स्पर्धकांची खिलाडू वृत्ती, सहकार्याची भावना, आत्मविश्वास, स्वीकारण्याची वृत्ती आणि संवादकौशल्य यांचे निरीक्षण करून प्रत्येक गटातून तीन विजेते निवडण्यात आले.

बक्षीस वितरण कार्यक्रमात बोलताना समाजकल्याण अधिकारी डॉ. यतिन पुजारी. सोबत मान्यवर.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी सकाळी सव्वासात वाजता मारुती मंदिर येथे स्पर्धेला हिरवा झेंडा दाखविला. जिल्हा परिषद भवन, माळनाका, एसटी विश्रामगृह आणि परत असे तीन गटांचे मार्ग होते. दौडीचा बक्षीस समारंभ छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर झाला. प्रत्येक गटात सर्वसामान्य शाळांमधील तीन विजेते, तर दिव्यांग विद्यार्थ्यांमधून एक विशेष विजेता निवडण्यात आला.

सहभागी झालेले दिव्यांग व सर्वसामान्य विद्यार्थी.स्पर्धेचा निकाल
गट पहिला : आदित्य केळकर, गुरुप्रसाद कोतवडेकर (दोघेही जीजीपीएस), सफवान पावस्कर (एम. एस. नाईक हायस्कूल). विशेष विजेता - साई चव्हाण (श्यामराव भिडे कार्यशाळा).

गट दुसरा : अमेय सावंत (जीजीपीएस), तबिश पटेल, मुसद्दिक पठाण (दोघेही एम. डी. नाईक हायस्कूल), विशेष विजेती - मनाली गवंडे (श्यामराव भिडे कार्यशाळा).

गट तिसरा : जियाद मुल्ला, मिमनासिर मस्तान (दोघेही एम. एस. नाईक हायस्कूल), वैदेही चव्हाण (फाटक प्रशाला). विशेष विजेती - श्रावणी रहाटे (सविता कामत विद्यामंदिर).

आविष्कार संस्थेचे अध्यक्ष सीए बिपिन शहा, वीरश्री ट्रस्टचे डॉ. नीलेश शिंदे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी डॉ. यतीन पुजारी, आविष्कार संस्थेच्या सचिव संपदा जोशी, ‘लायन्स’चे डॉ. शेखर कोवळे, डॉ. तोरल शिंदे, डॉ. शाश्वत शेरे सौ. सुमिता भावे, डॉ. कशेळकर, आंबवलेकर, सौ. वंदना घैसास, श्री. कुरे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

स्पर्धेकरिता गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या एनएसएस ग्रुपचे ५० विद्यार्थी, वीरश्री ट्रस्टच्या माध्यमातून सायकलस्वार, नर्स, प्रथमोपचार पुरविण्यात आले. दौडीला एनएसएस, रोटरी क्लब, लायन्स क्लब, धन्वंतरी हॉस्पिटल, आशादीप, संस्कार भारती इत्यादी संस्थांनी सहकार्य केले.

विजेत्यांसह मान्यवर

(एक झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत. आविष्कार संस्थेविषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZYLCH
Similar Posts
‘जीजीपीएस’मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन रत्नागिरी : शहरातील गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये (जीजीपीएस) वार्षिक क्रीडा महोत्सवाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले.
रत्नागिरी पोलिसांतर्फे नऊ नोव्हेंबरला कोस्टल मॅरेथॉन रत्नागिरी : रत्नागिरी पोलिसांतर्फे नऊ नोव्हेंबर २०१९ रोजी रत्नागिरी पोलीस कोस्टल मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील सहभागासाठी ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी सहा नोव्हेंबर ही अंतिम मुदत असून, जास्तीत जास्त रत्नागिरीकरांनी या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी केले आहे
विद्यार्थ्यांच्या कलाकौशल्याला वाव देण्यासाठी ‘जीजीपीएस’मध्ये प्रदर्शनाचे आयोजन रत्नागिरी : रत्नागिरीतील श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्रजी माध्यम शाळेत (जीजीपीएस) २८ फेब्रुवारी ते दोन मार्च २०२० या कालावधीत विद्यार्थ्यांनी कार्यानुभवातून बनविलेल्या वस्तू आणि चित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे दिवंगत कार्याध्यक्ष अरुअप्पा जोशी यांच्या
गोळाफेक स्पर्धेत ‘सूर्यदत्ता’च्या सावरी शिंदेला रौप्यपदक पुणे : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने घेण्यात आलेल्या १९ वर्षांखालील मुलींसाठीच्या राज्यस्तरीय गोळाफेक स्पर्धेत सूर्यदत्ता पब्लिक स्कूलच्या सावरी शिंदे हिने रौप्यपदक जिंकले. आता ती राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. १३.१२ मीटरचा पल्ला गाठून तिने हे यश संपादन केले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language